

गेम कंट्रोलरसह खेळा
सुसंगत डिव्हाइसेस शोधून काढा आणि कनेक्ट करा.
App Store वर कंट्रोलरसह गेम खेळण्यात स्वारस्य आहे? सुसंगत असल्यास, गेमच्या उत्पादन पेजवर तुम्हाला कंट्रोलर सपोर्टची यादी मिळेल आणि काही बाबतीत गेम डेव्हलपर सर्वोत्तम अनुभवासाठी कंट्रोलर वापरण्याची शिफारस देखील करू शकतात.
खेळण्यासाठी, तुम्ही कोणता कंट्रोलर वापरत आहात ह्याच्या आधारावर, तुम्हाला तुमच्या कंट्रोलरला Bluetooth किंवा Lightning पोर्टद्वारे तुमच्या Apple डिव्हाइसशी पेअर करावे लागेल. खेळण्यास तयार होण्यासाठी सुसंगत कंट्रोलर्सची संपूर्ण यादी आणि स्टेप-बाय-स्टेप सूचनांसाठी, सर्व तपशीलांसाठी Apple सपोर्ट ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
तुमच्या कंट्रोलरला कनेक्ट केल्यानंतर, सेटिंग > सामान्य > गेम कंट्रोलर वर जाऊन आणि तुमचे स्वतःचे प्रोफाइल समाविष्ट करुन अधिक कंट्रोल कस्टमायझेशन पर्याय एक्सप्लोअर करा, ज्यामध्ये स्क्रीनशॉट घेण्यासाठी आणि गेमप्ले व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी प्राधान्य दिलेले इनपुट समाविष्ट केले जाऊ शकतात.
तुमच्याकडे आधीपासून कंट्रोलर नसल्यास, तुम्ही खालील सिलेक्शन निवडू शकता.
आणि कंट्रोलरसह खेळण्यासाठी आणखी काही उत्तम गेम्स हवे असल्यास, ह्या शिफारशी ब्राऊझ पहा.