

इन-ॲप खरेदीविषयी
इन-ॲप खरेदी काय आहेत?
तुमचे आवडते अनेक विनामूल्य तसेच सशुल्क ॲप्स आणि गेम्स इन-ॲप खरेदी ऑफर करतात, हे असे व्यवहार आहेत जे ॲप परफॉर्मन्स किंवा डिजिटल वस्तू, कॉण्टेण्ट किंवा सेवा अनलॉक करतात. App Store वरील ॲपच्या उत्पादन पेजवर जाऊन तुमचे ॲप इन-ॲप खरेदी प्रदान करते किंवा नाही हे शोधू शकता. फक्त प्राप्त करा किंवा किंमत बटणाजवळ “इन-ॲप खरेदी” असे लिहिलेला संदेश शोधा.
तुम्ही कोणत्या प्रकारच्या इन-ॲप खरेदी करू शकता?
चार प्रकारच्या इन-ॲप खरेदी आहेत :
इन-ॲप खरेदी कशी कार्य करते
इन-ॲप खरेदी करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड प्रविष्ट करावा लागेल. तुम्ही तुमची प्राधान्ये सेट करू शकता जेणेकरून प्रत्येक इन-ॲप खरेदीसाठी किंवा प्रत्येक 15 मिनिटांनी पासवर्ड आवश्यक असेल. प्रत्येक 15 मिनिटांनी पासवर्ड आवश्यक करण्यासाठी तुमची प्राधान्ये सेट केल्याने तुम्ही तुमचा पासवर्ड पुन्हा प्रविष्ट न करता 15 मिनिटांसाठी अतिरिक्त इन-ॲप खरेदी करू शकता. tvOS मध्ये आम्ही तुम्हाला तुमचा पासवर्ड किती वेळा विचारावा हे बदलण्यासाठी, सेटिंग उघडा, त्यानंतर अकाउंट्स आणि iTunes व App Store वर टॅप करून अतिरिक्त खरेदीसाठी तुमच्या पासवर्ड सेटिंग बदला.
तुम्ही Touch ID वापरल्यास, प्रत्येक व्यवहारासाठी तो आवश्यक असेल.
तुमची सदस्यता मॅनेज करा
काही अॅप त्यांच्या कॉण्टेंटचा सदस्यतेवर आधारित अॅक्सेस देतात. एकच आयटम खरेदी करण्याच्या विपरीत, तुम्ही सदस्यता समाप्त करण्याचा पर्याय निवडत नाही तोपर्यंत त्या सदस्यतांचे ऑटोमॅटिकली नूतनीकरण केले जाईल. जर तुम्हाला तुमच्या सदस्यता बघायच्या, बदलायच्या किंवा रद्द करायच्या असतील, तर तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरून 'नूतनीकरण सेटिंग' सहजपणे बदलू शकता. तुमच्या Mac वर 'Mac App Store' वर जा, नंतर तुमच्या अकाउंटची माहिती पाहण्यासाठी तुमच्या डाव्या खालच्या कोपऱ्यातील 'प्रोफाइल आयकॉन' वर किंवा तुमच्या फोटोवर क्लिक करा (जर तुम्ही आधीपासूनच साइन इन केलेले नसेल, तर तुमच्या Apple अकाउंटसह ऑथेंटिकेट करा). तुमची सदस्यता पाहण्यासाठी सदस्यतांच्या उजव्या बाजूला, 'मॅनेज करा' ह्या विभागाच्या अंतर्गत, 'अॅपचे नाव' किंवा 'संपादित करा' वर क्लिक करा. तुमची सदस्यता मॅनेज करण्यासाठी पर्याय वापरा. तुम्ही वेगळ्या सदस्यता ऑफरची निवड करू शकता, किंवा तुमची सदस्यता रद्द करण्यासाठी 'सदस्यता रद्द करा' वर क्लिक करू शकता. जर तुम्ही रद्द केली, तर तुमच्या सध्याच्या बिलिंग सायकलच्या शेवटी तुमची सदस्यता थांबवली जाईल.
सदस्यता आणि गोपनीयतेविषयी
जेव्हा तुम्ही थर्ड पार्टी डेव्हलपरकडून ऑटो-रिन्यू होणारी सदस्यता खरेदी करता, तेव्हा आम्ही रॅण्डमली जनरेट केलेला सदस्य ID तयार करतो जो तुमच्यासाठी आणि त्या डेव्हलपरसाठी एकमेव असतो. डेव्हलपर त्यांच्या उत्पादनाचा परफॉर्मन्स समजून घेण्यासाठी ह्या सदस्य ID चा तसेच विक्री माहितीचा वापर करतात. तुम्ही एखाद्या विशिष्ट डेव्हलपरच्या तुमच्या सर्व सदस्यता रद्द केल्या आणि 180 दिवसांच्या आत पुन्हा सदस्यता घेतल्या नाही तर तुमचा सदस्य ID रीसेट केला जाईल.