

गोपनीयता व्याख्या आणि उदाहरणे
एखादे ॲप कोणत्या प्रकारचा डेटा संकलित करू शकते आणि डेव्हलपर किंवा त्यांचे थर्ड‑पार्टी भागीदार ह्या डेटाचा वापर कोणत्या प्रकारे करू शकतात ह्याविषयी अधिक जाणून घ्या.
डेटाचे प्रकार
संपर्क माहिती
नाव
जसे की व्यक्तीचे पहिले नाव किंवा आडनाव.
ईमेल ॲड्रेस
हॅश असलेल्या ईमेल ॲड्रेससह परंतु त्यापुरतेच मर्यादित नाही
फोन नंबर
हॅश असलेल्या फोन नंबरसह परंतु त्यापुरतेच मर्यादित नाही.
स्थानिक पत्ता
जसे की घरचा पत्ता, स्थानिक पत्ता किंवा मेलिंग पत्ता.
अन्य यूझरची संपर्क माहिती
ॲपच्या बाहेर तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी वापरली जाणारी कोणतीही इतर माहिती.
आरोग्य आणि फिटनेस
आरोग्य
आरोग्य आणि वैद्यकीय डेटा, ज्यामध्ये क्लिनिकल हेल्थ रेकॉर्ड API, हेल्थकिट API आणि मूव्हमेंट डिसऑर्डर API किंवा आरोग्यासंबंधी मानवी विषयावरील संशोधन किंवा तुम्ही प्रदान करता, त्या इतर कोणत्याही आरोग्य किंवा वैद्यकीय डेटामधील माहितीचा समावेश आहे परंतु हे त्यापुरतेच मर्यादित नाही.
फिटनेस
फिटनेस आणि व्यायाम डेटा.
आर्थिक माहिती
पेमेंट माहिती
जसे की पेमेंट प्रकार, पेमेंट कार्ड नंबर किंवा बँक अकाउंट नंबर. जर ॲप पेमेंट सेवा वापरत असेल आणि पेमेंट माहिती ॲपच्या बाहेर टाकली असेल, तर ती माहिती ह्या विभागात दिसणार नाही.
क्रेडिट माहिती
जसे की क्रेडिट स्कोअर.
कोणतीही आर्थिक माहिती
पगार, उत्पन्न, मालमत्ता, कर्ज किंवा इतर आर्थिक माहिती.
स्थान
अचूक स्थान
माहिती जी तीन किंवा अधिक दशांश स्थानांसह अक्षांश आणि रेखांश म्हणून समान किंवा अधिक रिझोल्यूशनसह तुमच्या स्थानाचे वर्णन करते.
ढोबळ स्थान
अक्षांश आणि रेखांशापेक्षा कमी रिझोल्यूशनसह तीन किंवा अधिक दशांश स्थानांसह तुमच्या स्थानाचे वर्णन करणारी माहिती, जसे की अंदाजे स्थान सेवा.
संवेदनशील माहिती
जसे की वांशिक किंवा जातीय डेटा, लैंगिक कल, गर्भधारणा किंवा प्रसूतीविषयक माहिती, अपंगत्व, धार्मिक किंवा तात्विक विश्वास, ट्रेड युनियन सदस्यता, राजकीय मत, अनुवांशिक माहिती किंवा बायोमेट्रिक डेटा.
संपर्क
जसे की संपर्कांची यादी, पत्ता पुस्तिका किंवा सामाजिक आलेख.
यूझर कॉण्टेण्ट
ईमेल्स किंवा टेक्स्ट संदेश
विषय, प्रेषक, प्राप्तकर्ते आणि ईमेल किंवा संदेशाच्या कॉण्टेण्टसह.
छायाचित्रे किंवा व्हिडिओज
तुमची छायाचित्रे किंवा व्हिडिओज.
ऑडिओ डेटा
तुमची व्हॉइस किंवा ध्वनी रेकॉर्डिंग्स.
गेमप्ले कॉण्टेण्ट
जसे की तुम्ही गेममध्ये तयार केलेला कॉण्टेण्ट.
ग्राहक सपोर्ट
ग्राहक सपोर्ट विनंतीदरम्यान तुम्ही जनरेट केलेला डेटा.
इतर यूझर कॉण्टेण्ट
तुम्ही जनरेट केलेला इतर कोणताही कॉण्टेण्ट.
ब्राऊझिंग हिस्ट्री
तुम्ही पाहिलेल्या, परंतु ॲपचा भाग नसलेल्या कॉण्टेण्टविषयीची माहिती जसे की संकेतस्थळे.
सर्च हिस्ट्री
ॲपमध्ये केलेल्या सर्चेसची माहिती.
आयडेंटिफायर
यूझर ID
जसे की स्क्रीन नाव, हँडल, अकाउंट ID, नियुक्त केलेला यूझर ID, ग्राहक क्रमांक, संभाव्य ओळखकर्ता किंवा इतर यूझर‑ किंवा अकाउंट‑स्तरीय ID जो तुम्हाला किंवा तुमचे अकाउंट ओळखण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
डिव्हाइस ID
जसे की डिव्हाइसचा जाहिरात आयडेंटिफायर किंवा इतर डिव्हाइस‑लेव्हल ID.
खरेदीची हिस्ट्री
तुमच्या खरेदी किंवा खरेदीची प्रवृत्ती.
यूसेज डेटा
उत्पादन संवाद
जसे की ॲप लॉन्च करणे, टॅप करणे, क्लिक करणे, स्क्रोलिंग माहिती, संगीत ऐकण्याचा डेटा, व्हिडिओ दृश्ये, गेम, व्हिडिओ किंवा गाणे ह्यांच्या जतन केलेली ठिकाणे किंवा तुम्ही ॲपशी कसा संवाद साधता ह्याविषयीची इतर माहिती.
जाहिरात डेटा
जसे की तुम्ही पाहिलेल्या जाहिरातींविषयी माहिती.
इतर वापरातील डेटा
ॲपमधली तुमच्या क्रियाकलापांविषयी इतर कोणताही डेटा.
डायग्नॉस्टिक्स
क्रॅश डेटा
जसे की क्रॅश लॉग.
परफॉर्मन्स डेटा
जसे की लॉन्च वेळ, हॅंग रेट किंवा ऊर्जा वापर.
इतर डायग्नोस्टिक्स डेटा
ॲपशी संबंधित तांत्रिक निदान मोजण्याच्या उद्देशाने संकलित केलेला इतर कोणताही डेटा.
इतर डेटा प्रकार
इतर कोणत्याही डेटा प्रकारांचा उल्लेख केलेला नाही.
डेटा वापर
जाहिरात किंवा मार्केटिंग
थर्ड‑पार्टी जाहिरात
जसे की ॲपमध्ये थर्ड‑पार्टी जाहिरात प्रदर्शित करणे किंवा थर्ड‑पार्टी जाहिरात प्रदर्शित करणाऱ्या संस्थांसोबत डेटा शेअर करणे.
डेव्हलपरची जाहिरात किंवा मार्केटिंग
जसे की ॲपमध्ये डेव्हलपरच्या स्वतःच्या जाहिराती दाखवणे, थेट तुम्हाला मार्केटिंग संप्रेषण पाठवणे किंवा तुम्हाला जाहिराती दाखवणाऱ्या संस्थांसोबत डेटा शेअर करणे.
ॲनालिटिक्स
विद्यमान उत्पादन फीचर्सची परिणामकारकता समजून घेणे, नवीन फीचर्सची नियोजन करणे किंवा प्रेक्षकांची संख्या किंवा वैशिष्ट्ये मोजणे ह्यासह तुमच्या वर्तनाचे मूल्यांकन करण्यासाठी डेटाचा वापर करणे.
उत्पादन वैयक्तीकरण
तुम्ही जे पाहता ते कस्टमाइझ करणे, जसे की शिफारस केलेल्या उत्पादनांची यादी, पोस्ट किंवा सूचना.
ॲप फंक्शनॅलिटी
जसे की तुम्हाला ॲपमध्ये ऑथेंटिकेट करणे, फीचर्स एनेबल करणे, फसवणूक रोखणे, सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करणे, सर्व्हर अपटाइम सुनिश्चित करणे, ॲप क्रॅश कमी करणे, स्केलेबिलिटी आणि परफॉर्मन्स सुधारणे किंवा ग्राहक सपोर्ट देणे.
इतर हेतू
इतर कोणताही वापर सूचीबद्ध केलेला नाही.
तुमच्याशी लिंक केलेला डेटा
तुमच्या ओळखीशी लिंक केलेला डेटा (तुमच्या अकाउंट, डिव्हाइस किंवा इतर तपशीलांद्वारे).
संबंधित गोपनीयता कायद्यांतर्गत परिभाषित केलेली वैयक्तिक माहिती आणि वैयक्तिक डेटा तुमच्याशी लिंक असलेली मानली जाते. डेटा तुमच्याशी लिंक केला जाऊ नये ह्यासाठी, संकलित केल्यानंतर डेव्हलपरने काही विशिष्ट ॲक्टिव्हिटी टाळणे आवश्यक आहे :
• त्त्यांनी तो डेटा तुमच्या ओळखीशी पुन्हा लिंक करण्याचा कोणताही प्रयत्न करू नये.
• त्त्यांनी इतर डेटा सेटशी डेटा जोडू नये ज्यामुळे तो तुमच्या ओळखीशी लिंक केला जाऊ शकतो.
तुमच्याशी लिंक नसलेला डेटा
तुमच्या ओळखीशी लिंक नसलेला डेटा (तुमच्या अकाउंट, डिव्हाइस किंवा इतर तपशीलांद्वारे).
तुमचा मागोवा घेण्यासाठी वापरला जाणारा डेटा
ट्रॅकिंग
जेव्हा तुमच्याबद्दल किंवा तुमच्या डिव्हाइसबद्दल संकलित केलेला डेटा लक्ष्यित जाहिरात किंवा जाहिरात मापनाच्या उद्देशाने थर्ड‑पार्टी डेटाशी जोडला जातो, तेव्हा ट्रॅकिंग होते. जेव्हा तुमच्याबद्दल किंवा तुमच्या डिव्हाइसबद्दलचा डेटा डेटा ब्रोकरसोबत शेअर केला जातो तेव्हाही ट्रॅकिंग होऊ शकते.
ट्रकिंग खालील परिस्थितींमध्ये लागू होत नाही :
• जेव्हा डेटा केवळ तुमच्याच डिव्हाइसवर लिंक केलेला असतो आणि जो तुमची किंवा तुमच्या डिव्हाइसची ओळख पटू शकेल अशा प्रकारच्या डिव्हाइसबाहेर पाठवला जात नाही.
• जेव्हा डेटा ब्रोकर त्यांच्याबरोबर शेअर केलेला डेटा केवळ फसवणूक शोधण्यासाठी आणि प्रतिबंधासाठी किंवा सुरक्षा उद्देशांसाठी आणि केवळ डेव्हलपरच्या वतीने वापरतो.
थर्ड‑पार्टी
डेव्हलपरच्या मालकीच्या नसलेल्या ॲप्स, संकेतस्थळे किंवा ऑफलाइन प्रॉपर्टीमधून संकलित केलेला तुमच्या किंवा तुमच्या डिव्हाइसचा कोणताही डेटा थर्ड‑पार्टी डेटा असतो.